मा.श्री.विलासराव देशमुख
 

तत्त्वज्ञान विषयाचे मराठीतून अध्ययन व संशोधन व्हावे,या विषयासंबधी उत्कृष्ट साहित्यनिर्मिती व्हावी,तात्विक चर्चाना व्यासपीठ उपलब्ध व्हावे,समाजपरिवर्तन व सामाजिक विकासाला उपयुक्त अशा तत्त्वज्ञानाची निर्मिती व्हावी,या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली ही संस्था आपल्या स्थापनेपासून गेल्या २५ वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहे.सामाजिकद्रृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद घडवून आणून त्यानिमित्याने
विच्यारवंताने मौलिक विचार लोकांपर्यत पोहोचविण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.रौप्यमहोत्सवानिमित्य प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेत संस्थेच्या वाटचालीतील ठळक घटनांचा आढावा घेतला जाईल,अशी आशा वाटते.

Read More    |    Comments

September 10, 2009मा.श्री.आर.आर.पाटील

 

व्यक्तिगत व सामाजिक जीवनाला स्वयंपूर्णता व अर्थपूर्णता प्राप्त करून देणार्‍या तत्त्वज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपली परिषद गेली २५ वर्ष कार्य करीत आहे.परिषदेने आपल्या स्थापनेपासुन अनेक रचनात्मक उपक्रम राबविले आहेत.
Read More    |    Comments