मा.श्री.आर.आर.पाटील (उप मुख्यमंत्री)

व्यक्तिगत व सामाजिक जीवनाला स्वयंपूर्णता व अर्थपूर्णता प्राप्त करून देणार्‍या तत्त्वज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपली परिषद गेली २५ वर्ष कार्य करीत आहे.परिषदेने आपल्या स्थापनेपासुन अनेक रचनात्मक उपक्रम राबविले आहेत.आध्यात्मिक क्षेत्रातील तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा,पर्यावरण नीती,उच्य शिक्षणाचे तत्त्वज्ञान,धर्मनिरपेक्षतता, सामाजिक समता, अदिवासींचे सांस्कृतिक तत्त्वज्ञान, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या थोर व्यक्तीचे जीवनकार्य इत्यादी उपक्रम राबवून परिषदेने मोठे योगदान दिले आहे.रौप्यमहोत्सवी अधिवेशनानिमित्य काढ्ण्यात यावयाच्या स्मरणिकेत परिषदेच्या गेल्या २५ वर्षातील कार्याचे सचित्र आणि समग्र प्रतिबिंब पहावयास मिळेल, असा मला विश्वास आहे.


Read more

मा.श्री.विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)

तत्त्वज्ञान विषयाचे मराठीतून अध्ययन व संशोधन व्हावे,या विषयासंबधी उत्कृष्ट साहित्यनिर्मिती व्हावी,तात्विक चर्चाना व्यासपीठ उपलब्ध व्हावे,समाजपरिवर्तन व सामाजिक विकासाला उपयुक्त अशा तत्त्वज्ञानाची निर्मिती व्हावी,या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली ही संस्था आपल्या स्थापनेपासून गेल्या २५ वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहे.सामाजिकद्रृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद घडवून आणून त्यानिमित्याने
विच्यारवंताने मौलिक विचार लोकांपर्यत पोहोचविण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.रौप्यमहोत्सवानिमित्य प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेत संस्थेच्या वाटचालीतील ठळक घटनांचा आढावा घेतला जाईल,अशी आशा वाटते.

Read moreमा.श्री.पृथ्वीराज चव्हाण (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ३० वे अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील गोवेली येथे आयोजित केले असल्याचे समजुन अतिशय आनंद झाला. आपले महाविद्यालय कल्याण आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठि शैक्षणिक दॄष्टिकोनातुन महत्वाचे आहे. विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणार्‍या आपल्या महाविद्यालयाने तत्त्वज्ञान परिषदेचे अधिवेशन आयोजित करुन एक मोठा टप्प ओलांडला आहे. या परिषदेमध्ये सादर होणार्‍या शोधनिबंधाची स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे हि कौतुकाची बाब आहे.

तत्त्वज्ञान परिषदेचे अधिवेशन व स्मरणिकेस माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा...

Read more

मा.श्री.दिलीप वळसे-पाटील (ऊर्जा व वैद्यकीय शिक्षण, उच्य व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन)

तत्त्वज्ञान विषयाचे मराठीत अध्ययन व संशोधन व्हावे, या हेतूने आपण आपली वाटचाल करीत आहात ही बाब कौतुकास्पद आहे. अशा अधिवेशनामुळे तात्विक चर्चाना व्यासपीठ उपलब्ध होईल.आपले हे काम चालू राहील अशी मला खात्री आहे. आपल्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा.

Read more